मनातल्या शब्दांना तिच्या....
मनातल्या शब्दांना तिच्या ...... मनातल्या शब्दांना तिच्या ओठांवर जागाच मिळाली नाही |२| अन काय सांगू तुम्हाला माझ्या प्रेमाची तऱ्हा संपलेल्या या कहाणीची कधी सुरवातच झाली नाही. मनातल्या शब्दांना तिच्या ओठांवर जागाच मिळाली नाही वाटलं आपणच जाऊन बोलावं तिच्याशी एकदा |२| जाऊन मग तिजपाशी नावपुकारा घेतला पण वळूनही तिने आम्हास पाहिले नाही मनातल्या शब्दांना तिच्या ओठांवर जागाच मिळाली नाही का वाळूनही तिने आम्हास पाहिले नाही ? |२| नंतर लक्षात जे नाव घेतले ते नावच तिचे नाही मनातल्या शब्दांना तिच्या ओठांवर जागाच मिळाली नाही आठवला तो दिवस जेव्हा दिसली होतीस तू पौर्णिमेतही चांदनं जेव्हा सांडत होतीस तू मी होतो तिथेच, तुझपाशी, तुला बघत....... का कोण जाणे तुला मी दिसलोही नाही.... आणि मनातल्या शब्दांना तिच्या ओठांवर जागाच मिळाली नाही... मनातल्या शब्दांना तिच्या ओठांवर जागाच मिळाली नाही... दया नंतर तिच्या शब्दासही आमची येऊ लागली बोलूही ते आमच्याशी लागले अन तिला कळलेही नाही पण मनातल्या शब्दांना तिच्या ओठांवर जागाच मिळाली नाही ...