Posts

सह्याद्री बोलवत आहे.......

                                                                      सह्याद्री बोलावत आहे  आज सह्याद्री बोलावत आहे ....... अरे ये कुठे आहेस ?  आधी तर यायचास प्रत्येक आठवड्याला माझ्यापाशी.. आज एका रविवारीही नाही ...... तूझ्याविना सर्व कडे, किल्ले एकटे आहे......अरे ये कुठे आहेस सह्याद्री बोलावत आहे ....... अरे ये कुठे आहेस ?  आल्यावर नेहमी खेळायचास मोकळ्या वाऱ्याशी रमायचा, झुलायचास, बोलायचास पिवळ्या फुलांशी.. पक्ष्यांचं, फुलपाखरांचही जमायचं तुझ्याशी... आज तेही तुला पुसत आहेत.......अरे ये कुठे आहेस ? सह्याद्री बोलावत आहे ....... अरे ये कुठे आहेस ?  बोलावत आहेत तुजला ते पाण्याने भरलेले गडटाके कारण त्यांनाही आठवतो तू...... तुझा पाणी पिऊन झालेला तृप्त चेहरा...... मग त्या गोड पाण्याची तू केलेली प्रशंसा..... म्हणून बोलले टाकेही हा गोडपणा आणायचा तरी कोणासाठी ? अरे ये कुठे आहेस ?  सह्याद्री बोलावत आहे ....... अरे ये कुठे आहेस ?  अरे ये उन्हाळा आलाय ........ त्यासोबत तुला आवडणारा रानामेवाही उगवलाय............ मला आठवतो, मनसोप्त करवंद खाऊन सावलीत निजणारा तू ......... अरे पण आज ते करवंदही गळून पडत

मनातल्या शब्दांना तिच्या....

  मनातल्या शब्दांना तिच्या ...... मनातल्या शब्दांना तिच्या ओठांवर जागाच मिळाली नाही |२| अन काय सांगू तुम्हाला माझ्या प्रेमाची तऱ्हा संपलेल्या या कहाणीची कधी सुरवातच झाली नाही. मनातल्या शब्दांना तिच्या ओठांवर जागाच मिळाली नाही वाटलं आपणच जाऊन बोलावं तिच्याशी एकदा |२| जाऊन मग तिजपाशी नावपुकारा घेतला पण वळूनही तिने आम्हास पाहिले नाही मनातल्या शब्दांना तिच्या ओठांवर जागाच मिळाली नाही का वाळूनही तिने आम्हास पाहिले नाही ? |२| नंतर लक्षात जे नाव घेतले ते नावच तिचे नाही मनातल्या शब्दांना तिच्या ओठांवर जागाच मिळाली नाही आठवला तो दिवस जेव्हा दिसली होतीस तू पौर्णिमेतही चांदनं जेव्हा सांडत होतीस तू मी होतो तिथेच, तुझपाशी, तुला बघत....... का कोण जाणे तुला मी दिसलोही नाही.... आणि मनातल्या शब्दांना तिच्या ओठांवर जागाच मिळाली नाही... मनातल्या शब्दांना तिच्या ओठांवर जागाच मिळाली नाही... दया नंतर तिच्या शब्दासही आमची येऊ लागली बोलूही ते आमच्याशी लागले अन तिला कळलेही नाही पण मनातल्या शब्दांना तिच्या ओठांवर जागाच मिळाली नाही                                            --©प्रथमेश