सह्याद्री बोलवत आहे.......

 

                                                                   सह्याद्री बोलावत आहे 



आज सह्याद्री बोलावत आहे ....... अरे ये कुठे आहेस ? 
आधी तर यायचास प्रत्येक आठवड्याला माझ्यापाशी..
आज एका रविवारीही नाही ......
तूझ्याविना सर्व कडे, किल्ले एकटे आहे......अरे ये कुठे आहेस


सह्याद्री बोलावत आहे ....... अरे ये कुठे आहेस ? 


आल्यावर नेहमी खेळायचास मोकळ्या वाऱ्याशी
रमायचा, झुलायचास, बोलायचास पिवळ्या फुलांशी..
पक्ष्यांचं, फुलपाखरांचही जमायचं तुझ्याशी...
आज तेही तुला पुसत आहेत.......अरे ये कुठे आहेस ?


सह्याद्री बोलावत आहे ....... अरे ये कुठे आहेस ? 


बोलावत आहेत तुजला ते पाण्याने भरलेले गडटाके
कारण त्यांनाही आठवतो तू...... तुझा पाणी पिऊन झालेला तृप्त चेहरा...... मग त्या गोड पाण्याची तू केलेली प्रशंसा.....
म्हणून बोलले टाकेही हा गोडपणा आणायचा तरी कोणासाठी ? अरे ये कुठे आहेस ? 


सह्याद्री बोलावत आहे ....... अरे ये कुठे आहेस ? 


अरे ये उन्हाळा आलाय ........ त्यासोबत तुला आवडणारा रानामेवाही उगवलाय............
मला आठवतो, मनसोप्त करवंद खाऊन सावलीत निजणारा
तू .........
अरे पण आज ते करवंदही गळून पडताऐत.....अरे ये कुठे आहेस......अरे ये कुठे आहेस.......


                                                                                                      --- ©प्रथमेश खालखोनिकर

Comments

Popular posts from this blog

मनातल्या शब्दांना तिच्या....